फॅबटेक फार्मसी कॉलेज आणि भरारी डिजिटल सोल्युशन्स मध्ये सामंजस्य करार

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मधील कॉलेज ऑफ फार्मसी व भरारी डिजिटल सोल्युशन्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे यांनी दिली
या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चर्चासत्र कार्यशाळा, मूल्यवर्धित अभ्यासक्रम, इंडस्ट्रियल ट्रेनिंग, प्लेसमेंट सर्व्हिस तसेच विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, स्किल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, क्लिनिकल ट्रायल्स इंटरशिप, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट ट्रेनिंग व जॉब, रिसर्च पेपर व रिपोर्ट रायटिंग, मेडिकल कोडींग, मेडिकल रायटिंग, इत्यादी प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळण्यास मदत होणार आहे. अशाप्रकारचा सामंजस्य करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात खूप मोठा फायदा होणार असल्याचे फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी सांगितले.
हा सामंजस्य करार संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी डिजिटल सोल्युशन्सचे ब्रिजेश तळवडकर (मानव संसाधन अधिकारी), दिव्या घडीगांवकर (प्रोजेक्ट मॅनेजर), बजरंग महाडिक (टेक्निकल प्रमुख), प्रीती पाटील (मानव संसाधन सहयोगी) फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.



