महाराष्ट्र
सांगोला: शासकीय कर्तव्य बजावण्यास हायगय केल्याने गुन्हा दाखल*
सांगोला विधानसभा निवडणूक 2024 निवडणूक कामाकरिता प्रथम मतदान अधिकारी (राखीव) वैभव भास्कर कदम सहशिक्षक सुलाखे हायस्कूल बार्शी यांना खवासपुर या ठिकाणी नेमण्यात आले होते
क्षेत्रीय अधिकारी एस.एम. म्हेत्रे यांनी वारंवार फोन केला परंतु फोन बंद असल्याचे त्यांनी लेखी अर्ज माननीय निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांना दिला त्यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांना कायदेशीर कारवाई करणे करिता आदेशित केल्याने विधानसभा निवडणूक 2024 चे शासकीय कर्तव्य बजावण्यास हयगय केली म्हणून भारतीय न्याय व संहिता 2023 कलम 223 प्रमाणे सह लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 चे कलम 134 प्रमाणे श्री साळुंखे यांनी दिनांक 19/11/2024 रोजी सांगोला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे