महाराष्ट्र

सांगोला विधानसभा मतदार संघासाठी 78.14% मतदान

दिनांक 20/11 /24 रोजी सांगोला विधानसभेची निवडणूक प्रक्रिया आज शांततेत पार पडले आहे आज दिवसभरात काही ठिकाणी मोठ्या रांगा लागण्याचे आढळून आले आहे एकूण 309 मतदान केंद्रावरील 333493 मतदारांनी नोंदणी केलेली होती त्यापैकी 172704 पुरुष ,160784 महिला व इतर 5 मतदारांनी नोंदणी केली होती.

सकाळी 7:00 ते 9:00 पर्यंत 18,674 मतदान झाले होते 5.60%
सकाळी 9:00 ते 11:00 पर्यंत 58,399 मतदान झाले होते 17.51%
दुपारी 11:000 ते 1:00 पर्यंत 105306 मतदान झाले होते 31.58 %
दुपारी 1:00ते 3:00 पर्यंत 161273 मतदान झाले होते 48.36 %
दुपारी 3:00 ते 5:00 पर्यंत 214423 मतदान झाले होते 64.30 %
सायंकाळी 5:00 ते 7:00 245420 मतदान झाले होते 73.59 %

खालील मतदान केंद्रावर रात्री 9:15 पर्यत उशिरापर्यंत मतदान चालू होते राजुरी, लक्ष्मीनगर, तरंगेवाडी, जवळा, आगलावेवाडी, सांगोला, बागलवाडी, एखतपूर, सोनलवाडी, भाळवणी , आणि महिम या केंद्रातील कामकाज उशीर पर्यंत सुरू होते आणि जवळा येथील मतदान रात्री 9:30 पर्यंत व राजुरी येथील मतदान रात्री 10:29 पर्यंत सुरू होते
फायनल मतदान आकडेवारी :136236 पुरूष मतदार, 124352 महिला मतदार, 1 इतर मतदार: एकूण 260589 मतदान झालेले आहे: एकूण टक्केवारी 78.14%

या कामी सकाळी 7:00 वाजल्यापासून वोटर टर्न रिपोर्टिंग टीम मध्ये 32 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ३०९ केंद्राची आकडेवारी नोंदवून त्यांचा रिपोर्ट एकत्रित करीत होते यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी मुख्याधिकारी सांगोला मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला सहाय्यक मिडीया कमलेश सातपुते पंचायत समिती सांगोला हे उपस्थित होते

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!