माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान व महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी निर्मिती सुत्रधार लोकसत्ता दुर्गा पुरस्कार विजेत्या शुभांगी दामले व सोहम आठवले लिखित “एक डोकं चार पाय” या दर्जेदार बालनाट्याचे सादरीकरण उत्कर्ष विद्यालयातील सभागृहामध्ये झाले. “विद्यार्थ्यांचा विकास हाच आमचा ध्यास “हे ध्येयवाक्य असणाऱ्या उत्कर्ष विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम घेतले जातात . यावर्षी नेहमीप्रमाणे कुलपद्धती राबवली गेलेली आहे .प्रत्येक कुलास विविध विषय देण्यात आले असून “गंधर्व “ कुलास कला तथा इंग्रजी हे विषय दिले गेलेले आहेत यामुळे या नाटकाचे संपूर्ण नियोजन गंधर्व कुलातील विद्यार्थी , कुलप्रमुख शिक्षक यांनी केले होते.
पालक, पाल्य , त्यांचे मित्र व पाळीव प्राणी यांच्यातील नातेसंबंध अतिशय कल्पकतेने या बालनाट्यात मांडलेला होता. वास्तुस्थितीवर हे नाटक आधारित असल्याने विद्यालयातील मुलांना हा विषय आपुलकीचा वाटल्याने कधी भावूक होवून तर कधी मनमुराद हासून मुलांनी या नाट्यास भरभरून प्रतिसाद दिला. या दर्जेदार सादरीकरणामुळे नाटकाची पूर्वतयारी पार्श्वसंगीत, नेपथ्य, सहज अभिनय हे सर्व मुलांनी जवळून अनुभवल्याने नाट्य ह्या कलेविषयी मुलांना निश्चितपणे शास्त्रशुध्द माहिती मिळाली आहे . सोहम आठवले , अद्वय पुरकर, सई भागवत,अर्णव वारियार समृध्दी कुलकर्णी यांच्या समृध्द अभिनयाने विद्यालयातील मुलांची मने जिंकली आहेत .
या कार्यक्रमास नवनिर्वाचित संस्थाध्यक्षा मा. दमयंतीताई , उपाध्यक्षा मा. डॅा.संजुताई, सचिव मा. वसुंधराताई ,सदस्य श्री . व सौ. संहिता कुलकर्णी ,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. कुलकर्णी सर. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. बनसोडे मॅडम, तथा उपमुख्याध्यापिका मा. कुलकर्णी मॅडम ,पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. संध्याताई तथा तीनही विभागाचे पर्यवेक्षक मा.शालिनीताई ,मा. भोसले सर , मा. मिसाळ सर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध पार पडला .