सावे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा. .

सावे माध्यमिक विद्यालयात दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान उद्देशिका प्रतिमेचे आणि संविधान पुस्तिकेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अर्जुन शेळके सर यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व कळावे व त्या ग्रंथाची माहिती व्हावी यासाठी संविधान पुस्तिका ठेवण्यात आली होती. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाबद्दल मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी भारतीय संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या संविधान उद्देशिकेचे वाचन केले. मुंबई येथे झालेल्या 26/11 रोजी च्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या सैनिक, पोलीस व निष्पाप नागरिकांसाठी श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षक श्री बर्गे सर यांनी केले तर आभार सहशिक्षक श्री मेटकरी सर यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.