न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाच्या आठवडा बाजार उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

सोमवार दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये बालचमुंचा आठवडा बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर, इंजिनीयर रमेश जाधव यांचे शुभहस्ते फित कापून या उपक्रमाचे औपचारिक रित्या उद्घाटन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दिनेश शिंदे सर यांचे कडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी संस्था सदस्य प्राध्यापक डॉक्टर अशोक शिंदे, प्रा.दीपक खटकाळे, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिनेश शिंदे सर, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य लक्ष्मण गावडे, उपप्राचार्य प्राध्यापक हेमंत आदलिंगे, उपमुख्याध्यापक रामभाऊ बेहेरे सर, पर्यवेक्षक प्रा.नामदेव कोळेकर, श्री राहुल मोरे सर, श्री दत्तात्रय पांचाळ सर, कार्यक्रम आयोजन समितीचे प्रमुख प्रा.जालिंदर टकले, माजी उपनगराध्यक्षा सौ स्वातीताई मगर, उद्योजिका सौ निता ढोबळे, सौ विद्या जाधव, उद्योजक अनिल दिघे, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व विज्ञान महाविद्यालय सांगोला मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आठवडा बाजार उपक्रमासाठी पालक व परिसरातील ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. त्याचबरोबर त्यांनी आठवडा बाजारातील बालविक्रेत्यांकडून पालेभाज्या व इतर वस्तू खरेदी करून त्यांच्या व्यवहारिक ज्ञानात भर घातली. एवढी गर्दी असून सुद्धा गडबडून न जाता, या बालविक्रेत्यांनी आलेल्या सर्व ग्राहकांशी जोखपद्धतीने व्यवहार केला.बालचमुना शाळेमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा व्यवहारामध्ये उपयोग कसा करावा, याची प्रत्यक्ष अनुभूती आली.
हा आठवडा बाजार उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिनेश शिंदे सर व सहशिक्षक अण्णासाहेब इमडे सर, प्रतिभा पांचाळ मॅडम, सौ योगिता तरकसबंद मॅडम, सौ माधुरी जाधव मॅडम, सौ.अश्विनी दौंडे मॅडम, सौ सोनाली मुंडे मॅडम, सेविका हिना मुलानी यांचे अनमोल सहकार्य लाभले.