महाराष्ट्र

31 डिसेंबर 2022 अखेर नगरपंचायत घरपट्टी  व पाणीपट्टी थकबाकी भरल्यास मालमत्ता करावरील व्याज माफ- मालोजीराजे देशमुख

 

HTML img Tag    
नातेपुते (सुनील ढोबळे):- नातेपुते नगरपंचायतीच्या घरपट्टी पाणीपट्टी संदर्भात चर्चा करून 31 डिसेंबर 2022 पर्यंत थकीत घरपट्टी पाणीपट्टी भरतील त्या सर्व मालमत्ताधारकांना नगरपंचायतीच्या वतीने आकारण्यात येणारे  दोन टक्के व्याज आकारण्यात येणार नसल्याचे मालोजीराजे देशमुख यांनी सांगितले
दिनांक 21 /11/ 2022 रोजी नातेपुते नगरपंचायतीच्या विविध कामांच्या माहितीसाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मालोजीराजे देशमुख बोलत होते.
 स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा 2022-23 शासनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र मध्ये राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये नातेपुते नगरपंचायत सहभाग घेणार असून कचरा मुक्त गाव करण्याचा संकल्प नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने नागरिकांचा शंभर टक्के सहभाग असणे आवश्यक आहे. तसेच शहरांमध्ये प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. प्लास्टिक बंदी ला डोळ्यासमोर ठेवून शहरांमध्ये दोन ठिकाणी कापडी पिशव्या देण्याचे ए टी एम बसवण्यात येणार आहे. त्याचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे.
 केंद्र शासनाची अमृत 2.0 पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी निसर्ग कन्सल्टन्सी पुणे यांना नातेपुते शहराचा डीपीआर बनवण्याचे कामकाज दिलेले आहे. 2055 पर्यंत ची लोकसंख्या निर्धारित धरून प्रत्येक व्यक्तीला रोज किती लिटर पाणी देण्यात येईल अशा प्रकारची योजना राबविण्यात येणार आहे. नातेपुते शहराच्या क्षेत्रफळा बरोबरच सर्व ठिकाणी वाड्या वस्त्यावर नातेपुते नगरपंचायतीचा पाणीपुरवठा कशा पद्धतीने पोहोचेल याचा विचार करण्यात येणार आहे. दर दिवस प्रति माणसी 135 लिटर पाणी देण्याची योजना करण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने नातेपुते  पाणीपुरवठा जलाशया शेजारी दहा लाख लिटरची एक मोठी पाणी साठा टाकी बांधण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने नातेपुते शहरांमध्ये नवीन दोन उंच पाण्याच्या टाकीचे नियोजन करण्यात आले आहे .तसेच पाणीपुरवठा योजना ज्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे त्या पाणी साठ्याचे तळे त्याची खोली वाढवण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने 59 किलोमीटर पर्यंत ही पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन  येणार आहे. त्याच पद्धतीने 120 कोटी रुपये पर्यंतचे बजेट या पाणीपुरवठा योजनेचे असून सध्या प्रस्ताव तयार करण्याचे आणि ते सादर करण्याचे काम सुरू आहे. तसेच नातेपुते शहरातील कोणत्याही रस्त्याची तोडफोड न होता किंवा वाहतुकीचा अडथळा येणार नाही अशा पद्धतीने पाणीपुरवठा योजना राबवली जाईल .तसेच नातेपुते नगरपंचायतीच्या मालमत्ता संदर्भात घरपट्टी आणि पाणीपट्टी ची माहिती घेतली त्याच पद्धतीने मागील पाणीपट्टी 65 लाख रुपये थकित असून चालूची पाणीपट्टी 34 लाख रुपये  आहे तसेच घरपट्टी थकीत 99 लाख रुपये असून चालूची घरपट्टी 46 लाख रुपये आहे. अशा पद्धतीने नातेपुते नगरपंचायतीची आजपर्यंत झालेली वसुली ही 20 लाख रुपये पर्यंत झालेली आहे. अशा पद्धतीने सर्व नातेपुते नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा आणि आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी नातेपुते नगरपंचायतीचे नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, बांधकाम सभापती अतुल पाटील, अण्णासाहेब पांढरे ,सविता बरडकर,रणजीत पांढरे,दीपक काळे ,अनिता लांडगे ,शर्मिला चांगल, माया उराडे ,दीपिका देशमुख ,अविनाश दोशी, रावसाहेब पांढरे असे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्याच पद्धतीने पाणीपुरवठा योजनेचे प्रेझेंटेशन करण्यासाठी पुण्यावरून निसर्ग कन्सल्टेशन चे अधिकारी आणि पदाधिकारी आले होते तसेच सर्व सभेचे आणि पत्रकार परिषदेचे कामकाज प्रदीप वनसाळे सभा अधिक्षक यांनी पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!