सांगोला तालुका

कृषि विभागामार्फत क्रॉपसॅप संलग्न रब्बी ज्वारी पिकाची महिलांची शेतीशाळा जवळा येथे संपन्न

कृषि विभागामार्फत क्रॉपसॅप संलग्न रब्बी ज्वारी पिकाची महिलांची शेतीशाळा मौजे जवळा येथे आयोजित करण्यात आली होती.

सदर शेती शाळेस माजी जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय जयमालाताई गायकवाड उपस्थित होत्या. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना(PMFME) योजनेअंतर्गत चालू केलेल्या सहा प्रक्रिया उद्योगांच्या लाभार्थी महिलांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सौ कोरे यांच्या युनिटची पाहणी करण्यात आली. मा.माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी या योजनेसाठी महिलांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन करून दर्जेदार प्रक्रियायुक्त मालाची निर्मिती करण्याचे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी श्री शिवाजी शिंदे यांनी ज्वारी उत्पादन वाढीची पंचसूत्री, कृषी विभागाच्या विविध योजना, PMFME योजना अंतर्गत कृषीमाल प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री भंडारे यांनी ज्वारी पिक लागवड तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती दिली.

 

 

कृषी सहाय्यक बाळासाहेब सावंत यांनी तालुक्यातील इतर प्रक्रिया युनिट ची माहिती महिलांना दिली व मार्केटिंगच्या संदर्भात मार्गदर्शन केले. सर्व महिलांना प्रत्यक्ष शेतामध्ये फेरोमन सापळ्याचे किडनियंत्रणातील महत्त्व पटवून सांगितले व त्याचे वाटप करण्यात आले. सदर शेती शाळेमध्ये फुगा फोडणे हा सांघिक खेळ घेण्यात आला. सदर शेती शाळेसाठी कृषी पर्यवेक्षक गायकवाड, पासले, कृषी सहाय्यक श्री प्रतीक डुबल, सावंत, शेजवळ, चंदनशिवे, देशमुख, रजपूत भाले उपस्थित होते व जिल्हा संसाधन व्यक्ती दीपक नरळे उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदनशिवे यांनी केले व आभार प्रदर्शन शेजवळ यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!