महाराष्ट्र
फॅब लाईन अप 2024-25 वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न*
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. फॅबटेक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मैदानी कौशल्य दाखवण्यासाठी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रूपनर, कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे चे प्राचार्य प्रा. एस. एन. दास, कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलच्या प्राचार्या सौ मानसी दास, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे सौ.सुरेखा रुपनर, सौ सारीका रूपनर, व्यवस्थापकीय प्रतिनिधी सौ. प्राजक्ता रुपनर , स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील, ए.ओ वर्षा कोळेकर हे मान्यवर लाभले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पाहुण्यांच्या हस्ते स्पोर्टमीटचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य सिकंदर पाटील यांनी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे मैदानी कौशल्याचे कौतुक केले. शालाबाह्य मैदानी क्रीडांमध्ये स्कूलमधील विद्यार्थी नेहमीच अव्वल येत असतात. यामध्ये बुद्धिबळ हॅमर थ्रो कुस्ती, रनिंग इ. स्पर्धेत विद्यार्थ्यी जिल्हास्तरीय यशस्वी होतात. हे आपल्या भाषणातून व्यक्त केले. प्रमुख पाहुणे कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे चे प्राचार्य प्रा. एस.एन दास यांनी अभ्यासाबरोबर मैदानी खेळ महत्त्वाचे आहे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. फॅब लाईन अप 2024 मध्ये येलो हाऊस, रेड हाऊस, ब्ल्यू हाऊस, ग्रीन हाऊस च्या विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने ड्रिल सादर केले.
स्कूलची हेड गर्ल अन्वी कांबळे व हेड बॉय ओंकार जानकर यांनी स्कूलचे प्रतिनिधित्व करत हाऊसचे कॅप्टन व व्हाईस कॅप्टन यांच्यासोबत विद्यार्थ्यांसह शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यानंतर स्कूलची हेडगर्ल कु.अन्वी कांबळे हिने विद्यार्थ्यांना अधिकृत शपथ दिली, यानंतर स्कूल मधील विद्यार्थ्यांनी मैदानी कौशल्य दाखवण्यास सुरुवात केले प्री प्रायमरी विभागात धावणे, कॅप गॉगल, पोटॅटोरेस इ. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर प्राथमिक विभागात बेडूक उड्या लिंबू चमचा धावणे बुक बॅलन्स दोरीवरील उड्या इ. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्य दाखवले, माध्यमिक विभागात कबड्डी लंगडी, बास्केटबॉल, थ्रो बॉल इ. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या हाऊसचे पॉईंट वाढवले. वार्षिक क्रीडा स्पर्धाचे नियोजन सुपरवायझर सौ.वनिता बाबर व क्रीडा शिक्षक पंचाक्षरी स्वामी यांनी केले. संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे ,स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपरवायझर वनिता बाबर व किरण कोडग यांनी केले. तर आभार कु. रेशमा तोडकर यांनी व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.