शहाजीबापू यांनी एकत्र राहण्याची जबाबदारी घ्यायला हवी होती.; दिपकआबा साळुंखे पाटील
सांगोला विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी आपण खचून जाणार नाही. आपला पराभव हा महाविकास आघाडीनेच केला. असून यापुढील काळात आबा तुम्ही बांधाल ते तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच आमचे धोरण असेल असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. शुक्रवार दि २९ रोजी सांगोला येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राहिलेल्या दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पराभवाचे चिंतन करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला हजारो दिपकआबा प्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.
बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, मी सत्तेचा सारीपाट घेऊन जन्माला आलो नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली आणि पराभवाला सुद्धा ताठ मानेने सामोरा गेलो मी माझ्या पूर्वजांची पुण्याई सांगून आणि जाती पातीचे राजकारण करून मते मागितली नाहीत. प्रचंड आर्थिक ताकद आणि घाणेरडे राजकारण याला नाकारून ५१ हजार स्वाभिमानी मतदारांनी स्वतःच्या मताची पैशांत किंमत न करता माझ्यावर विश्वास ठेवला याच स्वाभिमानी मतदारांच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवणार आणि जिंकणार असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.
जनतेच्या आग्रहाखातर आणि केलेल्या कामाच्या जोरावर आपण निवडणूक लढवली झालेला पराभव मान्य करून दुसऱ्या दिवसापासून आपण पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय झालो आहे. शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे जात पात पक्ष पार्टी न पाहता प्रामाणिकपणे काम करत राहीन. ३० ते ३५ वर्षात कधीच सत्ता मिळावी म्हणून काम केले नाही. ३५ वर्षातील फक्त ६ वर्षे विधान परिषदेचा आमदार म्हणून सत्ता मिळाली बाकी कधीच सत्तेचा लोभ धरला नाही. निस्वार्थ सेवा हा साळुंखे पाटील कुटुंबाचा धर्म आहे हीच शिकवण मला स्व ह भ प शारदादेवी साळुंखे यांनी दिली आहे. याच विचारावर शेवटच्या शसापर्यंत काम करत राहणार असल्याचेही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नमूद केले. तसेच या निवडणुकीत मदत करणाऱ्या सर्व स्वाभिमानी मतदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, अभिषेक कांबळे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांचे आवर्जून विशेष आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, आर डी पवार, पियुष साळुंखे, शिवाजी बनकर, शिवाजी कोळेकर, राज मिसाळ, संभाजी हरिहर, अजित देवकते, नितीन रणदिवे, विजय इंगवले, भारत नागणे, रफिक काझी, प्रा अनिल नवत्रे आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आबांनी सत्तेत रहावे असा सूर व्यक्त केला. मात्र दिपकआबा साळुंखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी सांगोला विधानसभा मतदारसंघातील दिपकआबाप्रेमी मतदार आणि लाखो अबाल वृद्ध जनता बांधिल राहील असेही स्पष्ट केले
मोठा भाऊ म्हणून बापूंनी जबाबदारी घ्यायला हवी होती
सांगोला तालुक्याचे कुटुंबप्रमुख आणि माझा मोठा भाऊ म्हणून शहाजीबापू पाटील यांनी एकत्र राहण्याची जबाबदारी घ्यायला हवी होती. मी २ वर्षापासून शहाजीबापूंना आपण एकत्र राहूया असा आग्रह करत होतो त्यासाठी आपल्याला एकत्रितपने प्रयत्न केले पाहिजेत. वरिष्ठांना भेटून आपल्या दोघांची भूमिका मांडली पाहिजे म्हणून वारंवार पाठपुरावा करत होतो परंतु मोठा भाऊ म्हणून जबाबदारी पार पडायला हवी होती असे दिपकआबांनी स्पष्ट केले.
जय वीरू पुन्हा एकत्र आले पाहिजेत…!!!
सांगोला तालुक्याचा सर्वांगीण आणि गतिशील विकास करायचा असेल तर शहाजीबापू पाटील आणि दिपकआबा साळुंखे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील जय वीरू एकत्र आले पाहिजेत दोघे एकत्र आले तर सांगोला तालुक्याच्या विकासाची बुलेट ट्रेन आणखी वेगाने धावेल म्हणून दोघांनीही झाले गेले विसरून पुन्हा एकदा एकत्र यावे असा आग्रह चिंतन बैठकीत कार्यकर्त्यातून पुढे येत होता.