मिरज रोड येथे रेल्वे हाईट गेज बसवावेत :-अशोक कामटे सामाजिक संघटना
मिरज रोड 32 बी रेल्वे ब्रिज पूर्वी पूर्वस्थितीत असलेले हाईट गेज बसवावेत अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील 10 दिवसापूर्वी अज्ञात अवजड वाहनाने धडक दिल्याने येथील हाईट गेज नादुरुस्त व निकामी झाल्याने काढून टाकले आहेत त्यामुळे सोलापूर, जत, पंढरपूर या भागातून अवजड वाहने मिरज कडे जाण्यासाठी वासूद चौकातून मिरज रोडने रेल्वे पुलाखालून जाण्याचा प्रयत्न करतात त्यांचा प्रयत्न असफल झाल्याने वाहनांची कोंडी या ब्रिज खाली सातत्याने होत आहे त्याकरता प्रतिबंध म्हणून पूर्वस्थितीत एचडीएफसी बँकेची मिरज रोडवर असलेले हाईट गेज रेल्वे इंजीनियरिंग विभाग पंढरपूर यांनी तात्काळ दुरुस्ती करून बसवावेत तसेच या ब्रिज खाली सातत्याने पाणी साठत असल्याने येथे चिखल, गाळ मोठ्या प्रमाणात साठत आहे या रेल्वे भूगोल बांधणी पासून लागलेले ग्रहन अद्याप संपताना दिसत नाही,परिणामी अनेक दुचाकी व इतर वाहने घसरून स्लीप होण्याच्या मुळे अपघात दररोज होत आहे तरी रेल्वे प्रशासनाने या भागात येणारे पाणी बंद करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अन्यथा सांगोला शहरवासीय येथील रहदारी करतात खुला असणारा 31 बी रेल्वे अंडरग्राउंड ब्रिज कायमस्वरूपी जनतेच्या वतीने बंद करण्यात येणार आहे तरी रेल्वे प्रशासनाने यावरती कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथे पाणी साठत असल्याने अनेकांचे अपघात होऊन अवयव निकामी झाले आहेत.
रेल्वे प्रशासनास संबंधित समस्या विषयी वारंवार पत्रव्यवहार, संपर्क साधून देखील गांभीर्याने येथील रेल्वे पुलाखालील दररोज घडणाऱ्याअपघाताविषयी, हाईट गेज विषयी रेल्वे इंजिनिअरिंग विभाग दखल घेणार नसेल तर अशोक कामटे संघटनेच्या वतीने रेल रोको करण्याचा इशारा दिला आहे.
निलकंठ शिंदे सर, संस्थापक अध्यक्ष :-शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला.