फॅबटेक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची सोलापूर झोन अंतर्गत महाविद्यालयीन खो – खो स्पर्धेसाठी निवड
सांगोला: डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या खो-खो स्पर्धेसाठी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील बिरा मधुकर वगरे , संकेत सुखदेव कारंडे, विश्वास राजाराम कोरे, सचिन खुशाबा कुलाल, मेघराज सुधीर इंगळे व स्नेहल संजय गरड यांची सोलापूर झोन अंतर्गत महाविद्यालयीन खो – खो स्पर्धेसाठी निवड झाल्याचे पत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणोरे ,(रायगड) सोलापूर विभागाचे सचिव यांनी दिले. हि स्पर्धा ए.जी.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी,सोरेगाव जिल्हा, सोलापूर येथे घेण्यात येणार आहे.
सोलापूर झोन अंतर्गत महाविद्यालयीन खो – खो स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे, प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे, डीन अँकँडमीक डॉ. शरद पवार आदींनी यशस्वी खेळाडूंचे आभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना क्रीडा समन्वयक प्रा.सुनीलकुमार बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले.