महाराष्ट्र
अनु. जाती,अनु. जमाती शेतकऱ्यांना कृषी योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मा. आयुक्त (कृषी) यांचे आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय कृषी विकास योजना –प्रति थेंब अधिक पीक या योजनेंतर्गत अनुसुचित जाती अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकरीता निधी उपलब्ध असल्याने ठिबक सिंचन , तुषार सिंचन बाबींकरीता अर्ज मागविण्यासाठी दि. 30 नोव्हेंबर 2024 ते 14 डिसेंबर 2024 कालावधित विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
तरी सदर अनु.जाती व जमाती शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत असे आवाहन मा. शुक्राचार्य भोसले जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.