सांगोला(प्रतिनिधी):-माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री.फक्कडराव निवृत्ती चांडोले यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुधा फक्कडराव चांडोलेे यांचे बुधवार दि.27 नोव्हेंबर रोजी निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय 79 वर्षे होते.त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सौ.सुधा चांडोले यांना जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका पुरस्कार, जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा रत्नाई पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या. तसेच पहिल्या तालुका मुख्याध्यापिका, श्रीराम भजनी मंडळाच्या सदस्या म्हणून त्यांचा नावलौकीक होता. त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत.त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.