नाझरे केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
नाझरे केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी श्रीधर कन्या प्रशाला नाझरे येथील क्रीडांगणावर उत्साही वातावरणात संपन्न झाल्या.स्पर्धेचे उद्घाटन नाझरे येथील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती नयना पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी नाझरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मल्लय्या मठपती साहेब, नाझरे केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री राजाराम कोळी गुरुजी, बलवडी शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर पवार सर, श्रीधर कन्या प्रशाला येथील सर्व शिक्षक स्टाफ, नाझरे केंद्रातील स्पर्धेसाठी आलेले जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. सर्व क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री माणिक मिसाळ गुरुजी,श्री विजयकुमार शिंदे गुरुजी ,श्री गोरखनाथ बनसोडे गुरुजी, श्री एकनाथ गुरव सर,श्री धनाजी पांढरे गुरुजी, श्री सिद्धनाथ धुकटे गुरुजी, श्री सागर गुरव सर, विशाल वाघमारे गुरुजी, श्री दिगंबर शिंदे गुरुजी, श्री तन्नू काझी गुरुजी, श्री गजानन मोहिते गुरुजी, श्री सुनील आदलिंगे गुरुजी, श्री अशोक गायकवाड सर, साहेबराव शिंदे गुरुजी,श्री शिवशरण गुरुजी, श्री राजाराम तेली गुरुजी यांनी काम पाहिले. शिक्षिका श्रीमती स्वाती पाटील मॅडम, श्रीमती आशा पवार मॅडम, श्रीमती सोनल सावंत मॅडम, श्रीमती माधुरी मॅडम, श्रीमती नंदादेवी खुणे मॅडमउपस्थित होत्या.
वैयक्तिक व सांघिक स्वरूपाच्या या स्पर्धेमध्ये कबड्डी या प्रकारामध्ये लहान गट मुले व मुली जि.प. बलवडी शाळेने प्रथम क्रमांक मिळविला. जिल्हा परिषद शाळा लिगाडेवाडी मुले द्वितीय क्रमांक मिळविला. तर मुलीमध्ये जि. प.शाळा अजनाळे द्वितीय क्रमांक लंगडी मुले लहान गट प्रकारामध्ये जि. प. शाळा सरगरवाडी प्रथम क्रमांक तर शिंदे सांगोलकर वस्ती शाळा द्वितीय क्रमांक मिळवला. लंगडी मुलांमध्ये जि. प. शाळा सरगरवाडी प्रथम तर बलवडी द्वितीय क्रमांक क्रमांक लंगडी मुलींमध्ये जि. प.बलवडी प्रथम क्रमांक तर जि.प. अजनाळे शाळेने द्वितीय क्रमांक मिळविला . खो खो प्रकारामध्ये शिंदे वस्ती अजनाळे मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर जि प नाझरे शाळा द्वितीय मुलींमध्ये जि.प.शाळा बलवडी खो खो प्रथम क्रमांक तर अजनाळे द्वितीय क्रमांक . वैयक्तिक खेळ प्रकार बुद्धिबळ स्पर्धा मुले जि. प बलवडी शाळेचा ओजस सतीश कारंडे केंद्रात प्रथम तर जि.प. नाझरे शाळेचा वेदांत राहुल कोटी बुद्धिबळ मध्ये द्वितीय क्रमांक. धावणे 200 मीटर मुले बलवडी शाळेचा या शिवाजी खुळपे प्रथम क्रमांक तर लिगाडेवाडी द्वितीय अभिषेक धोंडीराम गुरव अजनाळे द्वितीय क्रमांक . 100 मीटर धावणे संदीप तानाजी गोडसे बलवडी चा प्रथम क्रमांक तर विराट महेश लिगाडे लिगाडेवाडी द्वितीय 100 मीटर धावणे मुली संस्कृती विजय येलपले दिवाण मळा प्रथम क्रमांक तर धनश्री उमेश भोईटे शिंदे वस्ती अजनाळे द्वितीय क्रमांक. 200 मीटर धावणे मुली आरती जगन सोनवणे जाधव वस्ती प्रथम क्रमांक तर सृष्टी धनाजी पवार बलवडी द्वितीय क्रमांक .
सर्व यशस्वी खेळाडूंचे गटशिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले साहेब नाझरे केंद्राचे केंद्रप्रमुख मल्लय्या मठपती साहेब, केंद्रीय मुख्याध्यापक श्री राजाराम कोळी गुरुजी, बलवडी शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर पवार सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब खुळपे, बलवडी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष चांगदेव शिंदे, बलवडी गावचे सरपंच श्री ज्ञानेश्वर राऊत, डेप्युटी सरपंच श्री रविराज शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजी शिंदे, श्री विकास पवार, श्री विलास धायगुडे,श्री सुरेश गुरव सर्वांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या.