महाराष्ट्र
सांगोला तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन सहा रुग्णवाहिका मिळाल्या , तातडीने उपचारासाठी मदत मिळणार माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मागणीला यश
सांगोला – सांगोला तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नव्याने मिळालेल्या सहा रुग्णवाहिकेचे पूजन शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून श्रीफळ फोडून केले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर , वैद्यकीय अधिकारी डॉ कल्याण ढाळे, संजय मेटकरी , आरोग्य सहाय्यक जिलानी काझी , आरोग्य कर्मचारी तसेच रुग्णवाहिकेचे सर्व चालक उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेना १० वर्षे पूर्ण झाल्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे त्या आरोग्य विभागाकडे जमा होणार आहेत. सांगोला तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने गावे वाड्यावस्त्या चौहो बाजूंनी विखुरलेली आहेत. त्यामुळे त्या गावातील रुग्णांना वेळेत रुग्णसेवा मिळावी, वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब लागू नये या दृष्टीने नव्याने सर्व सोयी सुविधा अशा रुग्णवाहिका मिळाव्यात म्हणून आमदार शहाजी बापू पाटील यांनी दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शासनस्तरावरून नवीन सहा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या होत्या परंतु आचारसंहितेमुळे त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात दिल्या नव्हत्या काल शनिवारी सांगोला पंचायत समितीच्या आवारात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिकेचे पूजन करून त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांना नव्याने रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे वैद्यकीय अधिकारी सह ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे.
—————————————–
तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिकेची पूर्तता झाली आहे त्यामुळे गावातील गरोदर महिला, नवजात शिशु, लहान मुले तसेच अपघातग्रस्त , सर्वसामान्य रुग्णांना गाव ,घरापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत तातडीने उपचारासाठी सोयीचे झाले आहे – शहाजी बापू पाटील, माजी आमदार