महाराष्ट्र
सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन नेली तोडून
सांगोला(प्रतिनिधी):- अनोळखी इसमाने गळ्यातील तीन सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन तोडून नेली असल्याची घटना 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरातील जयभवानी चौक येथे घडली.फिर्याद संजय पवार (रा.अलराईन नगर, मोहर हॉटेल समोर, सांगोला) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
फिर्यादी संजय पवार यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ही दिनांक 23/11/2024 रोजी दुपारी 4 वाचे दरम्यान मौजे सांगोला येथील जय भवानी चौक येथुन अनोळखी इसमाने चोरी करुन घेवुन पळुन गेला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे सांगोला शहरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. पुढील तपास वजाळे हे करीत आहेत.