महाराष्ट्र
सांगोला तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा तालुक्यातील माजी सैनिकांतर्फे सत्कार

सांगोला:- सांगोला तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्था सांगोला व कल्याणकारी संस्था सांगोला तसेच आजी-माजी सैनिक संघटना वासुद-अकोला, चिनके, सोनंद, पाचेगाव, मांजरी, हंगिरगे, महिम, मानेगाव यांच्याकडून वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन या भावनेतून विविध प्रकारच्या झाडांची रोपे देऊन एक अनोखा प्रकारचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी माजी सैनिकांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन देत देशसेवेसाठी योगदान देणारे माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.