महाराष्ट्र
जि. प. सांगोलकर गवळीवस्ती शाळेतील विद्यार्थी बनले तंत्रस्नेही.

21 व्या डिजिटल आधुनिक काळात जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सुद्धा जागतिक तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे, शाळेतील विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, संगणक व अँड्रॉइड एलईडीची परिपूर्ण माहिती व्हावी व शाळेतील विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या तंत्रज्ञानाचा राज्यातील इतर विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने जि.प. प्राथमिक शाळा सांगोलकर गवळीवस्ती (तरंगेवाडी) शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक खुशालद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली “आम्ही तंत्रस्नेही विद्यार्थी” या यूट्यूब चैनलची आज निर्मिती केली.
विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या युट्युब चॅनेलचे उदघाटन जवळा केंद्राचे केंद्रप्रमुख तानाजी साळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. लतिका गावडे, शाळेचे मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थी यु ट्यूब चॅनेलमार्फत प्रत्येक इयत्तेच्या विषयाच्या पाठातील ई- चाचणीचे व्हिडिओ अपलोड करत आहेत. त्याचप्रमाणे वार्षिक नियोजनाप्रमाणे तंत्रस्नेही क्लुप्त्याचे व्हिडिओ विद्यार्थी स्वतः तयार करून अपलोड करत आहेत.
यामध्ये लोकेशन शेअर करणे, ॲप तयार करणे, पासवर्ड फोटो तयार करणे, फोटोचे पीडीएफ करणे, क्यूआर कोड तयार करणे, फोटोचे कोलाज करणे, AI तंत्रज्ञानाचा अध्ययनात वापर करणे अशा घटकाचे व्हिडिओ विद्यार्थी स्वतः तयार करून या युट्युब चॅनेलवर अपलोड करत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाची माहिती या यु ट्यूब चॅनेलमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
आजच्या युट्युब चॅनेल उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश व्हनखंडे यांनी केले तर आभार आण्णा गावडे यांनी केले.
———————————————–
पाठातील ई चाचणीचे व्हिडिओ तसेच विविध तंत्रस्नेही क्लुप्त्या त्याचे व्हिडिओ पाहून राज्यातील विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्यावत होणार असल्याने आमच्या “आम्ही तंत्रस्नेही विद्यार्थी” या आमच्या यूट्यूब चैनलला राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी भेट द्यावी.
ऋतुजा बंडगर,( विद्यार्थिनी) इयत्ता- चौथी.
———————————————–
शिक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थी लॅपटॉप, संगणक, मोबाईल, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बोर्ड याचा वापर करून विद्यार्थी तंत्रस्नेही बनत आहेत हे आमच्या केंद्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
तानाजी साळे, केंद्रप्रमुख- जवळा