रंगोत्सव स्पर्धेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिरचे दैदिप्यमान यश…,

सोनंद- प्रतिनिधी- सप्टेंबर २०२४ मध्ये नॅशनल लेवलला घेण्यात आलेल्या रंगोत्सव स्पर्धेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंदमधील इ. १ ली ते १२ वी पर्यंतचे १३२ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत तब्बल २४ विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मेडल्स मिळाली आहेत. त्यामध्ये प्रणश्री प्रविण जाधव हीला आर्ट मेरिट अवाॅर्डने सर्वोच्च सन्मान मिळाला असून १० विद्यार्थ्यांना गोल्ड , ८ विद्यार्थ्यांना सिल्ह्वर,४ विद्यार्थ्यांना ब्राँझ मेडल व एका विद्यार्थीनीस सरप्राईज गिफ्ट मिळाले आहे. सदर स्पर्धेतील सर्व गुणी विद्यार्थ्यांना संस्था सचिव मा.आनंदराव भोसले यांचे शुभहस्ते गौरविण्यात आले.
दि. ६ डिसेंबर महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुरुवातीला डाॅ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन शिक्षण संकुलातील सर्व संस्था पदाधिकारी, सर्व प्रशासन,शिक्षक व विद्यार्थी यांचेवतीने अभिवादन केले. याप्रसंगी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहून, देशाला एक सुदृढ लोकशाही कशी असते.हे गेली ७५ वर्षे आपण पाहत आहोत,असे उद् गार संस्था सचिव आनंदराव भोसले यांनी आपल्या मनोगतातून मांडले.इतर देशाच्या तुलनेत भारतात आपण सर्वसामान्य लोक भयमुक्त वातावरणात राहतो,याचे सर्व श्रेय डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.असे प्राचार्य हेमंत आदलिंगे यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्था अध्यक्ष इंजि. बाबासाहेब भोसले, सदस्या सौ.अनिता भोसले यांनी मुंबईतून फोनवर शुभेच्छा देऊन सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमप्रसंगी संस्था सदस्या सौ. रजनीताई भोसले, मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महांकाळ, पर्यवेक्षक सुभाष आसबे,सौ.सुषमा ढेबे, श्री.गेजगे सर, डाॅ. कु. समृद्धी भोसले, प्रा.आबासाहेब कोळी, प्रा विनायक कोडग,प्रा.अभिजीत पवार, श्री.मनोहर गायकवाड श्री.अस्लम शेख, श्री.राहुल काशीद, सर्व शिक्षक तसेच शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना बाबर यांनी केले.