सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान डॉ.ग्रंथमिञ गजानन कोटेवार भूषवणार

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे 44 वे वार्षिक अधिवेशन रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी राजर्षी शाहू सभागृह छत्रपती शिवाजी प्रशाला ,सरस्वती चौक ,सोलापूर येथे डॉ. गजानन कोटेवार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमिञ विजयकुमार पवार यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आ. सुभाष देशमुख आ. विजयकुमार देशमुख आ.देवेंद्र कोठे यांची उपस्थिती लाभणार आहे .प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्र. ग्रंथालय संचालक अशोकराव गाडेकर, पुणे विभाग विभागीय सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले, सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, वाचन चळवळीला प्रोत्साहन देणारे सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर मनोहर सपाटे, अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकरराव घुले, कोकण विभागीय ग्रंथालय संघाचे रत्नागिरी चे मा. कार्याध्यक्ष मनोज गोगटे इत्यादी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रथम सञा मध्ये सकाळी 11 ते 12:30 पर्यंत या वेळेत उद्घाटन उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये शासनमान्य ग्रंथालयाचे सध्याची स्थिती यावर परिसंवाद प्रभाकरराव घुगे, मनोज गोगटे हे मार्गदर्शन करणार आहे दुपारी दीड ते दोन या वेळेत शंका समाधान निरसन व ग्रंथालय कर्मचारी पदाधिकारी यांना शासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
खुले अधिवेशन दुपारी दोन ते अडीच या वेळेत होणार आहे समारोप कार्यक्रम दुपारी अडीच ते तीन या वेळेत होणार आहे या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालय कर्मचारी पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रंथमिञ कुंडलिक मोरे ,ग्रंथमिञ गुलाबराव पाटील ,प्रमुखकार्यवाह साहेबराव शिंदे यांनी केले आहे.