श्री दत्त जयंती निमित्त नाझरे – वझरे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्रीधर दत्ता नंद जुनाट मंदिराचे जीर्णोद्धारक बाळ ब्रम्हचारी योगी समर्थ सद्गुरु संजीव स्वामी महाराज यांच्या आज्ञेनुसार 69 वा दत्त जयंती महोत्सव श्री दत्त मंदिर नाझरे, वझरे येथे रविवार दिनांक आठ डिसेंबर ते 14 डिसेंबर अखेर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सप्ताहात दररोज गुरुचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताह तसेच सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री सात ते नऊ कीर्तन सेवा होणार आहे. यामध्ये रविवार आठ डिसेंबर रोजी ह. अंबादास करंडे महाराज पंढरपूर व बुद्धेहाळ येथील जागर, सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी ह. भ.प. नवनाथ महाराज वाळे खिंडीकर यांचे कीर्तन तर अहिल्यानगर येथील जागर, मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी राम हरी खंडागळे महाराज कोळे यांचे कीर्तन तर बलवडी येथील जागर, बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी एकनाथ महाराज सांगोलकर बलवडी यांचे कीर्तन व सांगोलकर वस्ती येथील जागर, गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी परमहंस राजयोगी उद्धव महाराज कोळे यांचे कीर्तन तर नाझरे येथील जागर, शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी आप्पा चव्हाण महाराज नाजरे यांचे कीर्तन व उदनवाडी येथील जागर, शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सद्गुरु संजीव दास महाराज यांचे शिष्य सुखदेव आदाटे महाराज यांचे कीर्तन सकाळी दहा ते बारा पर्यंत व त्यानंतर होईल. व श्रीची बारा वाजता दत्त जन्माची फुले पडतील.
शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी श्री ची फुले पडल्यानंतर गो पूजन, आरती, महाप्रसाद वाटप होईल. तसेच श्रीच्या पालखीची मिरवणूक नाझरे गावातून श्री संजीव लेझीम मंडळ यांच्या नाच गाण्यासह व वडगाव, वाटंबरे, चिनके, नागरे या दिंड्यांच्या समवेत निघणार आहे. तसेच सालाबाद प्रमाणे रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी कुस्त्याचे जंगी मैदान आयोजित केले आहे. तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजीव आश्रम नाझरे, वझरे तर्फे करण्यात आले आहे.