सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन पहिले पुष्प निवडणूक संपन्न
सांगोला ( प्रतिनिधी ) लोकशाहीमध्ये प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, चांगला उमेदवार निवडून दिला पाहिजे, हा राजकारणाचा धडा सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्रशालेत झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीमध्ये नुकताच गिरवला आहे.
लोकशाहीची मूल्ये रुजविण्यासाठी अगदी विद्यार्थी दशेपासून माहिती मिळावी या अनुषंगाने २६,२७,२८ डिसेंबर २०२४ रोजी होणाऱ्या सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पहिले पुष्प निवडणूक संपन्न झाली.
यासाठी इयत्ता पाचवी ते दहावी प्रशालेतून ५२ विद्यार्थ्यांची व ज्युनिअर कॉलेजमधून २० विद्यार्थ्यांची निवडणुकीद्वारे मतदानातून वर्ग प्रतिनिधी व वर्ग प्रतिनिधींच्या मतदानातून विद्यार्थी शिक्षक दिन प्राचार्य, जनरल सेक्रेटरी, विद्यार्थिनी प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली. यामध्ये ज्युनिअर कॉलेज विभागातून प्राचार्य पदी गुरुनाथ संतोष व्हटे, जनरल सेक्रेटरी (GS) पदी शिवराज जयवंत नवले, विद्यार्थिनी प्रतिनिधी(LR) या पदासाठी साक्षी बापूसो गायकवाड यांची निवड झाली.
प्रशाला विभागातून निवडून आलेल्या वर्ग प्रतिनिधी(CR) मधून मुख्याध्यापक(HM) या पदासाठी वरद यल्लाप्पा निंबाळकर, जनरल सेक्रेटरी(GS) या पदासाठी सुमित विठ्ठल कोळवले व विद्यार्थिनी प्रतिनिधी (LR) या पदासाठी वैष्णवी विजय शेंबडे यांची निवड झाली. शालेय निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा प्राचार्य अमोल गायकवाड यांचे हस्ते,उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले , ज्युनिअर कॉलेज निवडणूक विभागप्रमुख प्रा. डी. के. पाटील, सहायक निवडणूक विभाग प्रा. शिवशंकर तटाळे, प्रशाला निवडणूक विभागप्रमुख शिवाजी चौगुले, उत्तम सरगर,उत्सव विभागप्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा.तानसिंग माळी, प्रशाला उत्सव विभाग प्रमुख बाळराजे सावंत,नरेंद्र होनराव यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, विश्वेश झपके यांच्यासह सर्व संस्था सदस्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
निवडणुकीत मोठी चुरस- वर्गप्रतिनिधींची निवड करताना प्रथम सत्र परीक्षेमध्ये सर्व विषयात उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना उमेदवार म्हणून उभा राहता आले. त्यांना संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांचे मतदान होते. यातून निवडून आलेल्या वर्ग प्रतिनिधींच्या मतदानातून विद्यार्थी- शिक्षक दिन प्राचार्य, जनरल सेक्रेटरी व विद्यार्थिनी प्रतिनिधींची निवड झाली. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठी चुरस पाहावयास मिळाली. त्यातूनच लोकशाहीची मूल्ये, ती जपण्याची आवश्यकता, आपण मतदान हक्क का बजावायचा, हे विद्यार्थ्यांना कळले.