क्रीडा

भारतीय संघ आज उपांत्य फेरीचे दार उघडणार का ?

रोहित ब्रिगेड भिडणार बांगलादेशशी

आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ ग्रुप बी मध्ये टीम इंडियासाठी बांगलादेशविरुद्धचा सामना फार महत्वाचा असेल. कारण यापूर्वी त्यांना एक पराभवाचा धक्का बसला आहे, त्यामुळे या सामन्यातही भारताचा पराभव झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामन्यात भारत सामना जिंकून उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. दोन्ही संघ हा सामना ऐतिहासिक अॅडलेड ओव्हलमध्ये खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

भारतीय संघात आज मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिक जायबंदी झाल्यामुळे शेवटच्या पाच षटकांसाठी ॠषभ पंत यष्टीरक्षण करण्यासाठी आला होता. त्यामुळे त्याला आज संघात स्थान मिळणार असे दिसत आहे. त्याचबरोबर दीपक हुड्डा मागच्या सामन्यात अपयशी ठरल्याने त्याच्याजागी हर्षल पटेल किंवा एक अष्टपैलू खेळाडूचा विचार केला तर अक्षर पटेल यांचा विचार केला जाऊ शकतो. सध्या अॅडलेड ढगाळ हवामान असून पाऊस आणि वाऱ्यामुळे थंडावा आला आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येण्याची शक्यता असल्याने मैदाने ओलसर राहतील. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार बुधवारी दुपारी पाऊस विश्रांती घेईल. मात्र, सायंकाळी ६० टक्के पावसाची शक्यता आहे. म्हणूनच सध्या भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या मनात प्रतिस्पर्धी बांगलादेशपेक्षा पावसाबद्दल भीती जास्त आहे. या पावसामुळे भारतीय संघाचे ‘गणित’ बिघडू शकते.

आयसीसी टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामन्यात भारत सामना जिंकून उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!