सिंग इज किंग… अर्शदीप सिंगने सामना फिरवला
भारतीय संघ हरता हरता सामना जिंकला...

अॅडलेड : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. पावसाने या सामन्यात अजून रंगत भरली. भारताने या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी १८५ धावांचे आव्हान दिले. त्यानंतर बांगलादेशने दमदार सुरुवात केली होती. पण यावेळी पाऊस भारतासाठी धावून आला आणि बांगलादेशला विजयासाठी १६ षटकांमध्ये १५१ धावांचे टार्गेट देण्यात आले. पावसानंतर बांगलादेशचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले आणि हा सामना भारताच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली. अर्शदीप सिंगने पावसानंतर अचूक आणि भेदक मारा केला, त्यामुळेच भारताला या सामन्यावर पकड मजबूत करता आली.
भारतानं बांग्लादेशला १८५ धावांचं लक्ष्य दिलं. बांग्लादेशनं पॉवरप्लेमध्ये दे दणादण फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी ७ षटकं टाकल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. सध्या बांग्लादेशच्या बिनबाद ६६ धावा झाल्या आहेत. या सामन्यात पाऊस अडथळा आणेल असा अंदाज होता. तो खरा ठरला आणि नव्याने टार्गेट देण्यात आले. पावसानंतर भारतासाठी एक आनंदाची बातमी आली. कारण खेळपट्टीवर सेट झालेला लिटन दास हा बाद झाला आणि बांगलादेशला मोठा धक्का बसला. दासने यावेळी २७ चेंडूंत धडाकेबाज फटकेबाजी करत ६० धावांची खेळी साकारली.
कोहलीच्या या अर्धशतकाच्या जोरावर भारताला या सामन्यात धावांचा डोंगर उभारता आला. कोहलीने यावेळी नाबाद ६३ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच भारताला बांगलादेशपुढे विजयासाठी १८५ धावांचे आव्हान देता आले. भारताला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली नाही, कारम रोहित शर्मा हा लवकर बाद झाला. पण त्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची चांगली जोडी जमली. या जोडीने भारताला सावरले. राहुल यापूर्वी फॉर्मात नव्हता. पण त्याने या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावले. राहुलने यावेळी ३२ चेंडूंत ५० धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाला आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजील आला. कोहली आणि सूर्या यांती यावेळी चांगली जोडी जमली. पण सूर्यकुमार यादवला अर्धशतक झळकावता आले नाही. पण त्याने १६ चेंडूंत ३० धावांची तुफानी खेळी साकारली.