कार्यकर्तृत्वासाठीच्या प्रेरकशक्ती कै.बाईसाहेब झपके – झोन चेअरमन ला.राजीव कटेकर
सांगोला लायन्स क्लबकडून कर्तबगार महिला डॉक्टरांचा झाला सन्मान

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला नगर परिषद पहिल्या महिला नगराध्यक्षा कै.शोभनतारा उर्फ बाईसाहेब चं. झपके यांचे दुष्काळानंतर १९७३च्या कठीण काळामध्येही सांगोला नगर परिषदेच्या माध्यमातून झालेले उल्लेखनीय कार्य व शैक्षणिक , सामाजिक कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन झोन चेअरमन ला.राजीव कटेकर यांनी केले. कै. बाईसाहेब झपके यांचे २४ व्या स्मृतिदिनानिमित्त लायन्स क्लब सांगोला आयोजित सन्मान कर्तृत्वाचा गौरव महिला डॉक्टरांचा उल्लेखनीय कार्यासाठी सांगोला शहरातील कर्तबगार महिलांच्या सन्मान सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रांतपाल ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,सां.ता.शि.प्र.मंडळाचे सचिव म.शं.घोंगडे, उल्लेखनीय कार्यासाठी सांगोला शहरातील वैद्यकीय विविध विभागातील कर्तबगार महिला डॉक्टर्स, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण, संचालक ला.ॲड विजयसिंह चव्हाण कॅबिनेट ऑफिसर ला. गिरीश नष्टे,ला.उत्तम बनकर,ला.चेतनसिंह केदार,ला.कैलास भिगें व प्राचार्य भीमाशंकर पैलवान उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.व सन्मान कर्तुत्वाचा गौरव महिला डॉक्टरांचा अंतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी सांगोला शहरातील वैद्यकीय विभागामधील बालरोग तज्ञ डॉ.सुपर्णा केळकर,दंत रोग तज्ञ डॉ. अनिता जानकर,स्रीरोग तज्ञ डॉ.मेघना देवकते नेत्ररोग तज्ञ डॉ. वंदना गवळी,क्ष- किरण तज्ञ डॉ.सारिका लवटे, आयुर्वेद डॉ. जीवन मुक्ती डोंबे,भूलतज्ञ डॉ.शीतल येलपले या कर्तबगार महिला डॉक्टरांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सुपर्णा केळकर म्हणाल्या महिला डॉक्टर घरामध्ये व ऑपरेशन थेअरटर मध्ये ममत्वाची भावना ठेवून कार्य करतात हा विचार प्रमाण मानून आज लायन्स क्लब सांगोलाने स्त्री व स्त्रीत्वाचा अभिमान वाटावा असा कै.बाईसाहेब झपके यांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून कर्तबगार महिला डॉक्टरांचा प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या अध्यक्षतेखाली केलेला सन्मान सांगोला शहरातील पहिला सन्मान आहे व तो आम्हाला प्रेरणा देणारा आहे. सांगोले शहरात ४० पेक्षा जास्त महिला डॉक्टर कार्य करतात. त्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात आमचा झालेला सन्मान हा सर्व महिला डॉक्टरांचा सन्मान आहे.
तसेच सांगोला लायन्स क्लब व श्रीमंत विजयसिंह पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यामंदिरपरिवारातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे करता आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये एकूण 300 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोफत नेत्र तपासणी झाली त्यांना योग्य सल्ला दिला..
या कार्यक्रमासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, लायन्स क्लब ऑफ सांगोला पदाधिकारी व सदस्य, विद्यामंदिर परिवारातील सर्व शाखेचे प्राचार्य, उपप्राचार्य ,पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले.सचिव उन्मेष आटपाडीकर यांनी सूत्रसंचालन केले तर खजिनदार ला.प्रा.नवनाथ बंडगर यांनी आभार प्रदर्शन केले.
लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संघटना समाजाच्या अभ्युदयासाठी वेळोवेळी मौलिक कसे कार्य करत आहे. सांगोला लायन्स क्लब कडून कर्तृत्ववान महिला म्हणून कै.बाईसाहेब झपके यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगोला शहरांमध्ये पहिल्यांदाच वैद्यकीय क्षेत्रामधील कर्तबगार महिलांचा सन्मान झाला आहे ही गोष्ट मनाला आनंद देणारी आहे. कै. बाईसाहेब झपके यांना वडील कै.बापूसाहेब झपके व आजोबा कै. अण्णासाहेब झपके यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच सामाजिक व राजकीय कार्य करता आले. त्यामुळेच त्या नगराध्यक्षा झाल्या व त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,माजी प्रांतपाल
कै. बाईसाहेबझपके यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी दहा वाजता सांगोला विद्यामंदिरमध्ये कै. बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन झाले व संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी या स्मृतिदिनानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे अन्नदान केले व पंधरा हजार रुपये रोख देणगी दिली. यावेळी संस्था कार्यकारणी सदस्य शीला झपके,विश्वेश झपके व शालीनीताई पैलवान उपस्थित होते.