महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि.कॉलेज सांगोला विशेष श्रमसंस्कार शिबिराचे निजामपूर येथे उद्घाटन….

शिक्षण विभाग पुणे न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि. कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामपंचायत निजामपूर यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबिर निजामपूर येथे दिनांक 11 12 2024 ते 17 12 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन बुधवार दिनांक 11 12 2024 रोजी संपन्न झाले

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून संस्था सचिव मा. श्री विठ्ठलरावजी शिंदे सर लाभले तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक मा.श्री. प्रा. लक्ष्मण राख सर हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी सरपंच ग्रा. पं.निजामपूर मा. सौ. शितल सुभाष लवटे या होत्या यावेळी संस्था सदस्य प्रा. श्री.दीपक खटकाळे, प्रा. श्री.जयंत जानकर, प्राचार्य  श्री. केशव माने, निजामपूर हायस्कूल मुख्याध्यापक  श्री चंद्रकांत शिंदे, सर्व शिक्षक स्टाफ माजी चेअरमन श्री.गोरख सुखदेव कोकरे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.दादासो लक्ष्मण गोफणे, पोलीस पाटील  श्री. बिरासो नारायण माने, माजी सरपंच श्री. शिवाजी अभंग लवटे, माजी सरपंच श्री.मोहन दिगंबर कोळेकर, उपसरपंच श्री.धर्मराज आगतराव लवटे, सदस्य श्री.नानासो रामचंद्र कोळेकर, माजी व्हाईस चेअरमन श्री.राजाराम तुकाराम कदम, श्री.रामचंद्र कृष्णा कोकरे, श्री. विष्णू लहू पवार सर, श्री.जगन्नाथ धुळा कोकरे, श्री.समाधान रामू लवटे, श्री.अरविंद रावसो कचरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न झाले

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या स्वागता नंतर संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आले  यानंतर प्रास्ताविकातून प्रकल्पाधिकारी  प्रा.श्री. संतोष राजगुरू यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्टे स्पष्ट करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीविद्यार्थी व ग्रामस्थांना  दिली. यानंतर मनोगत व्यक्त करत असताना निजामपूर गावचे पोलीस पाटील  श्री. बिरासो माने यांनी पर्यावरण, सेंद्रिय शेती, आरोग्य या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक मा. प्रा. श्री.लक्ष्मण राख यांनी जीवनामध्ये संस्काराला फार महत्त्व आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम या ठिकाणी केले जाते विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी त्याचबरोबर जीवनाला दिशा देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होते तसेच मोबाईलचा वापर कमी करा, व्यसनापासून दूर राहा, आई-वडिलांची सेवा करा ,आरोग्याविषयी जागृत रहा ,पर्यावरणाचे रक्षण करा असा मोलाचा संदेश दिला तसेच यावेळी आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही यासाठी पळून जाऊन लग्न करणार नाही अशी विद्यार्थ्यांकडून शपथ घेण्यात आली.

यानंतर संस्था सचिव  मा. श्री.विठ्ठलराव शिंदे सर यांनी आपल्या मनोगतातून आयुष्याची जडणघडण होत असताना संस्काराचे महत्व ओळखून सत्वगुणांचा स्वीकार करून आपण आपले आयुष्य घडवू शकतो तसेच श्रमप्रतिष्ठेचे मूल्य स्पष्ट करून व्यक्ती आपल्या कर्माने श्रेष्ठ ठरते असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. सौ. जुलेखा मुलाणी यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी श्री. प्रा. मिलिंद पवार यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. श्री.पांडुरंग महादेव लवटे यांनी विशेष श्रम घेतले तसेच प्राचार्य श्री. केशव माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाधिकारी प्रा. श्री.संतोष राजगुरू, कार्यक्रमाधिकारी प्रा श्री मिलिंद पवार, कार्यक्रमाधिकारी प्रा. श्री.हिम्मतराव साळुंखे, कार्यक्रमाधिकारी प्रा. सौ. जुलेखा मुलाणी कार्यक्रमाधिकारी प्रा. सौ. सुनिता लिगाडे, श्री.पांडुरंग महादेव लवटे सर, श्री. सतीश आगावणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button