उत्कर्ष बालक मंदिरामध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरे…..

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचे उत्कर्ष बालक मंदिरामध्ये दि. 11 /12/ 2024 बुधवार रोजी स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्टेज पूजनाने करण्यात आली. स्टेज पूजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा मा.नीलिमाताई कुलकर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. कुलकर्णी सर माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक मिसाळ सर व भोसले सर ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षिका मजगे मॅडम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.विश्रांतीताई उपमुख्याध्यापिका स्वरालीताई बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका मा. संध्याताई उपमुख्याध्यापिका शालनताई व सांस्कृतिक विभाग उपस्थित होते.
३ते६ या वयोगटातील मुला मुलींचा सहभाग होता. शिशुरंजन, शिशुवर्ग व बालवर्ग या वर्गातील मुलांनी विविध वेशभूषासह गाणी, नृत्य व नाटिका सादरीकरण केले. या कार्यक्रमास बालचमूचे कौतुक पाहण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा मा. नीलिमाताई संस्थेच्या उपाध्यक्ष मा. संजूताई केळकर संस्थेचे सचिव मा. वसुंधराताई मा.मनीषाताई भोसेकर संस्थेतील सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक मुलांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे निवेदन बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका संध्याताई यांनी केले अशाप्रकारे हा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला.