महाराष्ट्र
बलवडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

वै. गुरुवर्य सोपान काका मारुती कारंडे सनगर बुवा यांचे स्मरणार्थ व वै. भीमाशंकर महाराज मंगळवेढेकर यांच्या प्रेरणेने बलवडी ता सांगोला येथे सोमवार दिनांक 16 डिसेंबर ते सोमवार दिनांक 23 डिसेंबर अखेर अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठ चालक म्हणून नवनीत महाराज करगणी कर हे काम पाहतील.
सप्ताहात पहाटे चार ते सहा काकडा भजन, सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते 12 गाथा भजन व दुपारी अडीच ते पाच ह .भ.प. सुप्रियाताई महाराज बंडगर यांची भागवत कथासार, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री ते अकरा हरिकीर्तन भजन होईल. सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी ह .भ.प. हनुमंत महाराज आटपाडकर यांचे कीर्तन, मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी ह.भ.प. अनिल महाराज तडवळेकर यांचे कीर्तन, बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी ह.भ.प. धनंजय महाराज दहिगावकर यांचे कीर्तन, गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी प्रथमेश महाराज गुजर यांचे कीर्तन, शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी ह.भ.फ. मच्छिंद्र महाराज गावडे यांचे कीर्तन, शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी गीतांजली ताई झेंडे यांचे कीर्तन, रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी अमोल महाराज सूळ यांचे कीर्तन, सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते बारा ह.भ.प. नवनीत महाराज करगणी कर यांचे काल्याचे किर्तन होईल.
सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते नऊ नगर प्रदक्षिणा व सकाळी नऊ ते बारा काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटप होईल तरी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बलवडी ग्रामस्थ यांनी केले आहे.