महाराष्ट्र
भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये पी.टी.बी.फाउंडेशन पुणे(कडलास) संघाने प्रथम क्रमांक पटकावला*

सांगोला पंचायत समितीचे पहिले सभापती,सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,लोटेवाडी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांच्या २८व्या स्मृतीदिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष) आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अरुण भाऊ शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डी.के.पाटील सर,प्राचार्य बी. एस. शिंदे सर,राहुल इंगोले सर,प्रशांत बुरांडे सर,संदीप केदार सर,प्राचार्य अजित घोंगडे सर,पर्यवेक्षक लक्ष्मण चव्हाण सर आणि प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,क्रीडाप्रे मी,ग्रामस्थ उपस्थित होते.
या स्पर्धेत पुणे,सांगली,सांगोला,सोलापूर, बारामती,कराड,इस्लामपूर,भूम,डि ग्रज, नेलकरंजी या विविध संघांनी सहभाग नोंदवला.या स्पर्धेतील अंतिम सामना जय मातृभूमी,सांगली आणि पी.टी.बी.फाउंडेशन,पुणे(कडलास) या दोन संघांमध्ये झाला. या चूरशीच्या अंतिम लढतीत पी.टी.बी.फाउंडेशन,पुणे(कडलास) या संघाने विजय मिळवला.
या संघाला पारितोषिकामध्ये रोख रुपये ३१,००१/- चषक आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. तर उपविजेत्या जय मातृभूमी,सांगली या संघाला रोख रुपये २५,००१/- चषक आणि प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांकासाठी बारामती क्रीडा मंडळ,बारामती संघाला रोख रुपये २०,००१/-चषक आणि प्रशस्तीपत्र, चतुर्थ क्रमांकासाठी जयंत पाटील स्पोर्ट्स, इस्लामपूर संघाला रोख रुपये १५,००१/- चषक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षीसे मालिकावीर-अक्षय बागल(पी.टी.बी.पुणे-कडलास), उत्कृष्ट चढाई-ऋषिकेश बजळकर(बारामती क्रीडा मंडळ), उत्कृष्ट पकड-सौरभ देशमुख(पी.टी.बी.पुणे-कडलास) यांना प्रदान करण्यात आले.
संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या शांततेत पार पाडण्यासाठी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सांगोला तालुका कबड्डी असोसिएशन व टीमचे विशेष सहकार्य लाभले.