महाराष्ट्र
एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा वर्धापन दिन संपन्न; संस्थेच्या दिनदर्शिकाचे शानदार प्रकाशन

सांगोला -महाराष्ट्र कर्नाटक कार्यक्षेत्र असलेल्या एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. सोलापूर शाखा सांगोला येथे काल बुधवार ११ रोजी संस्थेचा वर्धापन दिन संपन्न झाला. यानिमित्ताने संस्थेच्या सांगोला येथील कार्यालयात श्री. सत्यनारायण महापूजा चहापान अल्पोहार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या दिनदर्शिकाचे-२०२५ प्रकाशन करण्यात आले
.
एलकेपी मल्टीस्टेट संस्थेच्या महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात सुमारे ४३ शाखा कार्यरत आहेत. संस्थेने विविध शाखांच्या माध्यमातून सुमारे ३०० कोटी रुपयेचा व्यवसाय केल्याने सभासद, ठेवीदार ग्राहक, कर्जदार यांच्या सहकार्याने संस्था सर्वांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. एल के पी मल्टीस्टेट या संस्थेच्या वाटचाल व प्रगती बद्दल उपस्थित ठेवीदार, ग्राहकाकडून समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन अनिल इंगवले , व्हाईस चेअरमन सुभाष दिघे, संचालक जगन्नाथ भगत, संचालक डॉ.बंडोपंत लवटे , संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, उद्योगपती संजय साळुंखे, विमा प्रतिनिधी प्रवीण मोहिते, सूर्योदय संस्थेचे सीईओ अण्णासाहेब इंगवले, शाखाधिकारी सुजित केदार, ठेव विभाग प्रमुख सागर काशीद , रिजनल मॅनेजर शशिकांत पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जगन्नाथ भगत गुरुजी यांनी मानले.