सांगोला वनविभागाची मोठी कारवाई; कडुलिंब व चिंच लाकुड मालासह ट्रक जप्त

सांगोला: वनविभागाचा वाहतूक परवाना नसताना कडूलिंब जळावू लाकुड व चिंच जळावु लाकुड याची विनापरवाना वाहतूक करणार्या ट्रकवर कारवाई करण्यात आली असल्याची घटना गुरुवार दि.12 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वा च्या दरम्यान घडली. यामध्ये कडूलिंब जळावू लाकुड 15 घन मीटर व चिंच जळावु लाकुड 13 घन मीटर असे एकुण 28 घन मीटर लाकुड मालासह ट्रक जप्त करण्यात आला आहे. यावेळी मधुकर बोरगे (ट्रक चालक), लक्ष्मण माळी रा. आंधळगाव ता. मंगळवेढा (लाकुड व्यापारी), निसार शेख (ट्रक मालक) आदी तीन जणांवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी वनगुन्हा नुसार नोंद केला आहे.
मधुकर बोरगे (ट्रक वाहन चालक) यांने दिलेल्या माहितुसार सदर ट्रकमध्ये कडुलिंब जळावु लाकुड व चिंच जळावु लाकुड मौ. आंधळगाव ता. मंगळवेढा येथून मालकी क्षेत्रातून लाकुड माल भरलेला आहे असे सांगितले. लाकुड व्यापारी लक्ष्मण माळी रा. आंधळगाव ता. मंगळवेढा येथील असून सदरचा ट्रक आंधळगाव येथून इचलकरंजी येथे लाकुड विक्रीसाठी घेवून जात असताना सांगोला हद्दीमध्ये वनविभागाचा वाहतूक पास नसल्यामुळे लाकुड मालासह जप्त केला आहे.बाजार भावप्रमाणे सदर लाकडाची किंमत अंदाजे 30 हजार रुपये होत असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी तु.वि. जाधवर हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे श्री. एन. आर. प्रवीण, मा.उपवनसंरक्षक, सोलापूर श्री. लेफन्टंट कुशाग्र पाठक व मा. सहा वनसंरक्षक (कॅम्पा), सोलापूर श्री.व्ही.एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरची कारवाई श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला व वनपाल सांगोला – जे. जे. खोंदे, वनरक्षक महुद बु// के. एन. जगताप यांनी केली.