सांगोला महाविद्यालयामध्ये संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांचा स्मृतीदिन साजरा

सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा सांगोला तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती दे.भ.संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांचा 28 वा स्मृतीदिन सांगोला महाविद्यालयात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्याहस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सांगोला तालुक्याच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक जडण घडणीमध्ये दे.भ.संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या स्मृतीदिना निमित्त तालुक्यात विविध संस्था, शाळा व महाविद्यालयाचे वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी याप्रसंगी व्यक्त् केले.
या कार्यक्रमाचे नियोजन आय. क्यू. ए. सी. कोऑडीर्नेटर डॉ. राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमोल पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे यांनी सहकार्य केले. श्री श्री बाबासो इंगोले आणि श्री. अमर केदार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.