सांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिरमध्ये इयत्ता ११ वी नवगतांचे  उत्साहात स्वागत 

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यू .कॉलेज सांगोला येथे शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४  प्रवेश प्रक्रियेनुसार दि.३ जुलै २०२३ रोजी इयत्ता अकरावी कला, वाणिज्य व शास्त्र शाखेचे वर्गाची सुरूवात झाली.
यानुसार पहिल्या दिवशी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे  गुलाब पुष्प देऊन  स्वागत करण्यात आले. सदर स्वागत समारंभ  प्राचार्य गंगाधर घोंगडे , उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभिषण माने,  पोपट केदार , शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात  गुलाब पुष्प देऊन संपन्न झाला.
यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील  शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!