महाराष्ट्र
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी या शाळेचे विज्ञान प्रदर्शनामध्ये सुयश

महूद (ता.सांगोला) येथील श्री खंडोबा देवाची यात्रा नुकतीच संपन्न झाली. या यात्रेत दरवर्षीप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी शाळेने घवघवीत सुयश प्राप्त केले.
इयत्ता पहिली ते चौथीच्या गटात दक्ष सोमनाथ घाडगे या विद्यार्थ्याने सोलर पॅनल या प्रयोगात प्रथम क्रमांक पटकावला. तर शिवतेज बिरबल वाघमोडे या विद्यार्थ्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग या सादरीकरणात द्वितीय क्रमांक मिळवला. तर राजवर्धन स्वप्निलकुमार लवटे-पाटील या विद्यार्थ्याने जल वाचवा निसर्ग वाचवा या प्रयोगात तृतीय क्रमांक पटकाविला.या यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ.अनिकेत देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष समाधान पाटील,खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष तुकाराम भुसनर,बाळासाहेब पाटील, ॲड्. धनंजय मेटकरी,यात्रा कमिटीच्या चेअरमन सविता येडगे, व्हाईस चेअरमन वर्षा महाजन,सचिव महादेव येळे, खजिनदार वनिता कोळेकर,सरपंच संजीवनी लुबाळ, ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील,आशाबाई कांबळे,मालन आटपाडकर,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वंदना पाटणे,धुळा सातपुते, उमेश महाजन,विठ्ठल तांबवे या शिक्षकांचे तसेच सोमनाथ घाडगे, बिरमल वाघमोडे या पालकांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.चव्हाणवाडी व केसकरवस्ती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य प्रेरक म्हणून लाभले.