महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये मंगळवार दि. 17/12/2024रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या आज शेवटच्या दिवशी इ. 5वी ते 9वी च्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. सोमवार दि.16/12/2024 व मंगळवार दि. 17/12/2024 अशा दोन दिवस या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.आज दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये या स्पर्धेचे उद्घाटन सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबुरावजी गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, इंग्लिश मेडिअमच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे,सुकेशनी नागटिळक, डी. के. पाटील, श्री.अजित मोरे, सांगोला महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री.चेडे सर उपस्थित होते.

 

तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीचे प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे यांनी करून दिला तसेच मान्यवरांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले.
यानंतर विद्यार्थ्यांना क्रीडा प्रतिज्ञा देण्यात आली. सुरूवातीला स्वागत नृत्य त्यानंतर झुंबा नृत्य, फ्लॉवर ड्रील,अम्ब्रेला ड्रील, रिबीन ड्रील, सारी ड्रील, लेझीम डान्स यांचे सुंदर असे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. व त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून स्पर्धेस सुरूवात झाली.

 

स्पर्धा संपल्यानंतर लगेचच्या बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके,सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. म. सि. झिरपे, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. म. शं. घोंगडे, खजिनदार श्री. शं. बा. सावंत, सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे,सुकेशनी नागटिळक ,श्री.डी.के.पाटील सर उपस्थित होते.

 

संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर व मान्यवरांच्या व उपस्थित पालकांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यानिमित्ताने बोलताना झपके सर यांनी अशा पध्दतीने पहिल्यांदाच या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. तसेच या स्पर्धा चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्या याबद्दल इंग्लिश मेडिअमच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यामंदिर परिवारातील शिक्षक त्याचबरोबर मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल सांगोला महाविद्यालयाच्या सर्व टीमचे आभार मानले व पुढील वर्षी याही पेक्षा चांगल्या प्रकारे नियोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पर्धा विभाग प्रमुख कु. पल्लवी थोरात यांच्यासह सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल व सांगोला महाविद्यालय त्याचबरोबर विद्यामंदिर परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिपाली बसवदे यांनी केले.

 

————————–
सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. बाबुरावजी गायकवाड यांनी क्रीडा स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक केले व आपल्या ग्रामीण भागामध्येसुध्दा इतक्या चांगल्या पध्दतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविल्या जातात याचा मला अभिमान वाटतो अशा शब्दांत संस्था व विद्यालयाबद्दल गौरवोद्गार काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button