महाराष्ट्र

शिक्षणाला खेळाची जोड देणे आवश्यक:-प्राचार्य डॉ.सुरेश भोसले.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या क्रीडा स्पर्धेस सुरूवात

शिक्षणाला खेळाची जोड असणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी केले.सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

 

 

सोमवार दि.16/12/2024  रोजी सांगोला महाविद्यालय,सांगोला या ठिकाणी क्रीडा स्पर्धेस सुरूवात झाली. प्रमुख पाहुणे  म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री.सुयोग नवले होते.तसेच व्यासपीठावर संस्थाध्यक्ष श्री.प्रबुध्दचंद्र झपके सर, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य श्री.अमोल गायकवाड,सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक श्री.उदय बोत्रे,नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील,कु.सुकेशनी नागटिळक,सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री.सुनील भोरे, श्री.डी.के.पाटील सर, श्री.अजित मोरे इ. उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण देणे महत्त्वाचे असून चांगल्या शरीरामध्ये चांगले मन वास करत असते. विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक व व्यक्तिमत्त्व विकास करावयाचा असेल तर जीवनामध्ये खेळ महत्वाचा आहे. हे सांगून सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे प्रतिमापूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका श्रीमती  शिल्पा ढाळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली व नंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर केले. तसेच योगा, झुम्बा नृत्य, पॉमपॉम ड्रील,ट्रायकलर ड्रील, बलून ड्रील, पेपर फॅन ड्रील सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

तद्नंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ प्रकार घेण्यात आले.उपस्थित पालकांसाठीही वेगवेगळ्या मनोरंजक खेळाचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते तसेच शेवटी पं.सं.सांगोल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी पी. एल. कुमठेकर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख कु. पल्लवी थोरात यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शुभांगी घार्गे,स्वप्नाली एखतपुरे यांनी केले.

———————————

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले हे क्रीडा स्पर्धेचे नियोजन पाहून भारावून गेले व अगदी ऑलिंपिक सामन्याच्या उद्घाटनाप्रमाणेच अतिशय सुंदर अस नियोजन केले आहे. याबद्दल त्यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारयांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button