फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

सांगोला: फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी निशिगंधा माने हिने बाल शिवाजींचा पाळणा सादर केला. फार्मसी व अभियांत्रिकीचे विद्यार्थी लिंगराज बिराजदार, श्रुती तांबे, अपेक्षा साळुंखे यांनी मनोगतामधून व गीत सादरीकरणातून महाराजांना आदरांजली वाहिली. यावेळी जय भवानी जय शिवाजींच्या घोषणेने सर्व फॅबटेक टेक्निकल कॅम्पस दुमदुमून गेला होता.
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री.भाऊसाहेब रूपनर ,मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर ,कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे, फार्मसी प्राचार्य डॉ.संजय बैस, डीन ॲकॅडमिक डॉ.शरद पवार यांच्या उपस्थित संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन फार्मसीचे प्रा.अमोल पोरे यांनी केले.