महाराष्ट्र

जि.प.प्रा मुलींची शाळा जवळे यांनी जुनी चावडी येथे भरवला आनंद बाजार.

जवळे वार्ताहर. दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा जवळे यांनी शाळेतील मुलींना व्यवहार ज्ञानाचे उपयोजन करता यावे म्हणून मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी जुनी चावडी येथील शाळेसमोरील बाजारपेठेत आनंद बाजाराचे आयोजन केले.यामध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी पालेभाज्या,फळे फळभाज्या,मोड आलेली कडधान्य विक्रीसाठी आणली होती. तसेच खाऊ प्रकारात ढोकळा,मेदुवडा,इडली,शेंगदाणे,चिक्की भेळ अशा अनेक पदार्थांचा समावेश होता त्याचबरोबर स्टेशनरी साहित्याची सुद्धा बरीच विक्री झाली.आनंद बाजारात ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.या बाजारामुळे मुलींचा आनंद ओसंडून वाहत होता दिवसभर विक्री रक्कम आणि बाजार याची चर्चा त्यांच्यात चालू होती.

या आनंद बाजारासाठी माजी आमदार दीपक आबा साळुंखे- पाटील हे आवर्जून उपस्थित होते.तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.छाया वांडरे,सदस्य सौ.राजलक्ष्मी देशमुख सौ.आक्काताई गावडे,श्री.अमोल साळुंखे श्री.अप्पासो आलेगाव हे उपस्थित होते.चिमुकल्यांच्या या आनंद बाजारात शिक्षक श्री. बागल,श्री.व्हनखंडे श्री.सरवदे,श्रीमती जंवजाळ तसेच शाळा परिसरातील महिलांनी उपस्थित राहून मुलींचा आनंद द्विगुणीत केला.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विकास साळुंखे,सहशिक्षिका श्रीमती रतन कोळेकर व श्रीमती सुवर्णा शेडसाळे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button