आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी घेतली ना.नितीन गडकरी यांची भेट; ना.नितीन गडकरी यांचेकडून विजयाबद्दल कौतुक
विकासकामे मार्गी लावण्यासाठी आ. डॉ.बाबासाहेब देशमुख यांचेकडून सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू

सांगोला: सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते,वाहतुक व महामार्ग मंत्री मा.नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी सांगोला विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा सन्मान करत विजयाबद्दल अभिनंदन करून कौतुक केले.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे आहेत. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे अचानक प्रकाशझोतात आले आहेत. अत्यंत नवखे असताना व कोणत्याही निवडणुकीचा अनुभव नसताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मिळवलेल्या विजयाचे सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही कौतुक सुरू असून हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मा.नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी ना.गडकरी यांचे आशीर्वादही आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतले. मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या आहेत.
भेटी दरम्यान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी
सांगोला तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा केली त्यासाठी ना. नितीन गडकरी यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून यापुढील काळात सांगोला विधानसभा मतदारसंघातील कामासाठी माझी नेहमी मदत राहील अशी ग्वाही ना .नितीन गडकरी यांनी यावेळी दिली असल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
याप्रसंगी ना.नितीन गडकरी यांनी आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.महाराष्ट्राच्या दुष्काळाची दाहकता, दुष्काळ दुखणं आम्हाला गणपतराव देशमुखांमुळे समजली.आबासाहेब हे अनेक वर्षे पाण्यासाठी संघर्ष करत होते. भाजप सरकारने सर्व योजनांना निधी उपलब्ध करून दिल्याने आज हे प्रकल्प पूर्णत्वास आले असून हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री ना .नितीन गडकरी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्या