महाराष्ट्र

डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे उज्ज्वल यश

सांगोला (वार्ताहर) बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांचे वतीने इयत्ता सहावी व नववी मधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार निर्माण करणे तसेच वैज्ञानिक संकल्पना दृढ करण्यासाठी डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा घेण्यात येते.

सदर परीक्षा लेखी स्पर्धा, प्रयोग स्पर्धा, कृती-संशोधन व मुलाखत या चार टप्प्यांमध्ये घेतली जाते.

सदर परीक्षेमध्ये प्रशालेमधील इयत्ता 6 वी मधील दीक्षांत सुभाष क्षीरसागर, दिशा बाबासो शिंदे, सार्थक हरिश्चंद्र लवटे, वेदांत नागनाथ हवेली, स्नेहा संतोष टकले, श्लोक सागर सासणे, रुचा मंगेश शेटे, नम्रता सुशांत रुपनर, अथर्व विजय पवार, प्रज्वलिता पुंडलिक पवार, रुणाल उमेश नवले, अक्षरा अजित नवले, अलविना इम्रानखान मुल्ला, अथर्व अमोल कोरे, अनुराधा सुखदेव काशीद, विराज सुदाम कोळेकर, सौरव सर्जेराव दिघे, शर्वरी सचिन डोंबे, आर्यन संजू चव्हाण, अदित्य मोहन भोसले हे 20 विद्यार्थी तर इयत्ता 9 वी मधील मृणाल उमेशकुमार महाजन, मनीष मनोजकुमार पाटील, भक्ती भारत कदम, यशश्री सचिन गायकवाड, वेदांगी हेमंत नीलकंठ, शिवानी संजय दिवसे, चतुर्दशी विनायक साळे, अनुष्का सिद्धेश्वर बनसोडे, जिज्ञासा तानाजी घाडगे, सिद्धी अमोल उकळे, अस्मिता सुखदेव काशीद, श्रीयश नागनाथ स्वामी, अथर्व रुपेश खटकाळे, अर्जुन बापूसो सावंत, प्रतीक अमोल नलवडे, श्रावणी सिद्धेश्वर चव्हाण हे 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्कार नारायण नवले व अर्णव चतुरगुण औताडे या इयत्ता 6 वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील रोहिणी शिंदे (इ. 6 वी विभाग प्रमुख), शुभांगी घोंगडे (इ. 9 वी विभाग प्रमुख) तसेच यतिराज सुरवसे, उत्तम बेहेरे, अमोल रणदिवे, विनीत चिकमने, रमेश बिले यांच्यासह सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष मा. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव मा. म.शं. घोंगडे, संस्था सहसचिव मा. प्रशुद्धचंद्र झपके साहेब, खजिनदार मा. शं.बा. सावंत, कार्यकारणी सदस्य मा. विश्वेश झपके यांच्यासह प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका सौ.शहीदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदिप धुकटे, मच्छिंद्र इंगोले, सुरेश मस्तुद, नामदेव खंडागळे (संस्था बाह्यपरीक्षा प्रमुख), वैभव कोठावळे (प्रशाला बाह्यपरीक्षा प्रमुख) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी करत पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button