थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेत गेल्या 12 तासात काय काय घडलं?

  • साधारण रात्री 10.30 च्या सुमारास मासेमारी करून या गावातील काही लोक घरी जात होते
  •  11 वाजता डोंगराचा काही भाग खचत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं
  •  काही वेळाने घरं माती खाली गेली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं
  • 11:30 वाजता गावातील  सरपंच  आणि काही गावकरी घटना स्थळी पोहचले
  • 12 वाजता  त्यांनी स्थानिक पोलीस आणि यांना तहसील कार्यालयाला याबाबत कळवलं
  • 12 : 30 वाजता स्थानिक पोलीस व रुग्णवाहिका इतर प्रशासन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले
  • 1 ते 1:30 दरम्यान स्थानिक आमदार महेश बालदी कार्यकर्त्यांसह दाखल  झाले
  • 2 वाजता  घटनास्थळी गिरीश महाजन आले आणि पाहणी केली
  • 2.30 वाजता उदय सामंत , दादा भुसे दाखल झाले आणि पाहणी केली
  • 2.45  वाजता ndrf टीम दाखल झाली
  • 4 वाजेपर्यंत घटना घडली तेव्हापासून स्थानिक लोकं आणि उपस्थित असलेले प्रशासनाचे काही कर्मचारी लोकांना बाहेर काढत होते.  शोध कार्य करत होते
  • 4.30 वाजता शोधकार्य मोहिमेसाठी पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील दाखल झाले
  •  5 वाजण्याच्या सुमारास  रेस्क्यू टीम वर जात असताना एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू
  •   5.30 वाजेपर्यंत 25 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं तर चार जणांचा मृत्यू झाला होता
  • सकाळी 6 च्या सुमारास इंडिया रेपची टीम आणि इतर यंत्रणा रेस्क्यूसाठी पुन्हा वर गेल्या
  • 6.30 वाजता एनडीआरएफ सहा इतर पथकांचे शोध कार्य सुरू झाले
  • सकाळी 7.30 वाजता  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल
  • सकाळी 7.45 वाजता हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन केलं केले जाणार त्यासाठी सीएम कडून फोन केला गेला
  • 8. 45 वाजता मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत
  • 9.16 वाजता 80 लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश. पाच जणांचा मृत्यू.
  • 9.45  दुर्घटनास्थळी उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांनाही नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.

दुर्घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांचा आक्रोश 

दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या 80 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर  70 ते 80 जण अद्याप बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळापर्यंत जाण्याचा रस्त्या अत्यंत निसरडा आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण होऊन बसलंय. कशाचीही पर्वा न करता सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button