सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचा व इंग्लिश मीडियम स्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ शिक्षक पालक संघ व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष , उपाध्यक्ष,सदस्यांच्या हस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर प्राथमिक विद्यालयाचे प्र मुख्याध्यापक उदय बोत्रे,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शिल्पा ढाळे, शुभांगी पवार, पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर,सुकेशनी नागटिळक, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य,प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन प्रमुख चेतन कोवाळे, इंग्रजी माध्यमाच्या स्नेहसंमेलन प्रमुख सायली मॅडम दोन्ही माध्यमाचे विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थिनी प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष साळे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चालत असणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती सांगून सर्व विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय वर्ग आणि कष्ट घेणाऱ्या शिक्षक बंधूंचे कौतुक केले.
वार्षिक स्नेहसंमेलन 2024- 2025 मध्ये कागदकाम, मातीकाम, कोलाजकाम ,कला प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन क्रीडा स्पर्धेत लंगडी स्पर्धेतील द्वितीय,तृतीय आणि नृत्य स्पर्धेतील द्वितीय,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. बक्षिस वाचन स्नेहलता बाबर, प्रियांका झाडबुके, पुस्तके मॅडम, पल्लवी थोरात यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहलता बाबर, यांनी केले तर आभार शुभांगी पवार मॅडम यांनी मानले.