महाराष्ट्र

समृद्ध गाव अभियान सक्षमपणे राबवणार – आ. सुभाष बापु देशमुख.

सोलापुर जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने व सहभागातुन समृद्ध गाव अभियान प्रभावीपणे राबवणार असल्याचे राज्याचे माजी सहकारमंत्री दक्षिण सोलापुर चे आमदार सुभाष बापु देशमुख यांनी सांगितले. सांगोला येथे आयोजित स्नेहसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना आ. सुभाष बापु देशमुख म्हणाले की, सोलापुर जिल्हयामध्ये कृषी,सहकार,पर्यटन, उदयोग,शिक्षण,आरोग्य अशा सर्व क्षेत्रामध्ये प्रगती चा वेग वाढविण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेवून सोलापुर जिल्हयाचे नाव महाराष्ट्र राज्यामध्ये अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्टाच्या बळावर नंदनवन फुलविले आहे. सांगोला तालुक्यातील उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ व भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

सामाजिक कार्यातील योगदाना बद्दल आपुलकी प्रतिष्ठानचा सन्मान करण्यात आला. या वेळी अॅड.गजानन भाकरे,पोपट बंडगर,मोहन मिसाळ, संजय तोडकरी,दादासाहेब खडतरे,तानाजी केदार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी विजय कुलकर्णी,सी.ए. उत्तम बनकर,डॉ. शिवराज भोसले,लोकमंगल बँक शाखाधिकारी प्रविण भोसले व पतसंस्थेचे शाखाधिकारी दत्तात्रय दिवसे, कर्मचारी तसेच सांगोला तालुक्यातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक वैभव लांबोरे,सुत्रसंचलन शंभु माने, आभार विजय कुलकर्णी यांनी मानले.

 

लोकसहभागातुन सांगोला तालुक्यात ७७oo वहयांचे वाटप करणार- अॅड.गजानन भाकरे.

आ. सुभाष बापु देशमुख यांच्या सत्कारासाठी हार,फेटे,शाली या पेक्षा वह्या आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते या अवाहनास सांगोलेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या वेळी बापु ७७ हजार मताधिक्यानी विजयी झाल्याबद्दल लोकसहभागातुन सांगोला तालुक्यातील शाळांमध्ये ७७oo वहयांचे वाटप करणार असल्याचे अॅड. गजानन भाकरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button