महाराष्ट्र
सांगोला तालुक्यात संगेवाडी येथे मंजूर आदेश व पहिला हप्ता वितरण कार्यक्रम संपन्न

सांगोला तालुक्यातील संगेवाडी ग्रामपंचायत मध्ये प्रौढ दृश्य प्रणाली द्वारे राज्यस्तरीय कार्यक्रम 4: 45 वाजता श्री शिव छत्रपती संकुलन बालेवाडी पुणे येथून सुरू झाला आहे यामध्ये पहिला हप्ता वितरण व मंजुरीचे आदेश इत्यादी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जिल्हा तालुका व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावर घरकुल लाभार्थींना मंजुरीचे पत्र वितरणाचा कार्यक्रम झाला आहे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या गृहोत्सावाच्या कार्यक्रमास सर्व ग्रामपंचायतचे सरपंच महोदयांच्या अध्यक्षतेखाली आजी-माजी पदाधिकारी पालक अधिकारी पंचायत अधिकारी संपर्क अधिकारी यांचे उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत मंजूर आदेश व पहिला हप्ता वितरण करण्यात आला आहे
मौजे संगेवाडी ग्रामपंचायत येथे सरपंच समाधान ओव्हाळ यांचे अध्यक्षतेखाली व पालक अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला पंचायत अधिकारी समीक्षा हेमगिरी व उपस्थित ग्रामस्थ यांच्या समक्ष आज प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत एकूण मंजूर साठ लाभार्थी पैकी उपस्थित 38 लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप करण्यात आले आहेत त्याचबरोबर पहिला हप्ता सुद्धा वितरण कार्यक्रमाद्वारे करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत संगेवाडी येथे विस्ताराधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली