महाराष्ट्र
फॅबटेक पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी घेतला मॅथ्स बाजारचा अनुभव

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान , गणित विषयात आवड निर्माण व्हावी यासाठी मॅथ्स बाजारचे आयोजन केले होते. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये मॅथ्स बाजार मोठ्या स्वरूपात भरला होता.
या मॅथ्स बाजारचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, सौ सुरेखा रुपनर सौ.सारिका रुपनर, प्राचार्य श्री सिकंदर पाटील हे लाभले. मान्यवरांच्या हस्ते व पालक प्रतिनिधी समवेत गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून मॅथ्स बाजारचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गणिताचे व्यवहार ज्ञानात महत्त्वाचे स्थान आहे गणित हा विषय आवडीने शिकला पाहिजे ही लघूनाटीका डॉ . अमोल रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सादर केली. मॅथ्स टिचर सौ.कोमल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भूमितीय कोन व त्यांचे शास्त्रशुद्ध माहिती विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त सादर केली.
फॅबटेक स्कूलमध्ये मॅथ्स बाजार हा नेहमी मोठ्या स्वरूपात भरत असतो. पालकांचा या मॅथ्स बाजारामध्ये सक्रिय सहभाग असतो. या बाजारामध्ये भाजीपाला, स्टेशनरी, बेकरी प्रॉडक्ट्स, फळे, खेळणी ,औषधे, किराणा वस्तू, स्वादिष्ट फूड स्टॉल इत्यादी विद्यार्थ्यांनी दुकाने लावली होती. फॅबटेकच्या मॅथ्स बाजारात खरेदी विक्री हे मोठ्या प्रमाणात होत असते. हा बाजार यशस्वी होण्यासाठी गणित शिक्षक व सांस्कृतिक विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, एक्झिक्युटी डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मॅथ्स बाजार भरवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अन्वी कांबळे व कु. वैष्णवी खरात यांनी केले तर आभार कु. अजय पवार यांनी व्यक्त केले. मॅथ्स बाजार यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.