साने गुरुजी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी

तमाम शिक्षकांचे श्रद्धास्थान पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांची शतकोत्तर जयंती नाझरे, वझरे येथील श्री दत्त मंदिरात हनुमान तालीम समोर साजरी करण्यात आली. स्वर्गीय गुंडाप्पा सदाशिव झाडबुके व स्वर्गीय सुशीला गुंडाप्पा झाडबुके यांचे ट्रस्ट वतीने मेडशिंगी, इयत्ता तिसरी ते आठवी पर्यंतच्या बाल पैलवानाला दुधाचा ग्लास व प्रत्येकी शंभर रुपये देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वस्ताद अप्पासाहेब चव्हाण वस्ताद एकनाथ जाधव तसेच दत्त मंदिर पुजारी विनायक पाटील इत्यादी मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक रविराज शेटे यांनी केले. तसेच साने गुरुजी यांच्या विषयी मुलांना माहिती झाडबुके गुरुजींनी दिली.
सदर प्रसंगी प्रगतशील शेतकरी दत्तात्रय खोकले, प्रमोद चौगुले, हनुमंत गोसावी, सोमनाथ नलवडे, सिद्धनाथ गिड्डे, शुभम ढोबळे, संजय आलदर, सर्जेराव मिसाळ, रविराज चव्हाण, रेहान मुलानी, गणेश जाधव, कुणाल सुतार, सोहम चव्हाण, वेदांत नलवडे, प्रेम चव्हाण, आदित्य जाधव, समर्थ गोसावी, शौर्य शिंदे, सिद्धार्थ शिंदे, ओंकार चव्हाण, दत्तभक्त गण उपस्थित होते.