महाराष्ट्र
रोटरी क्लब सांगोला यांनी साजरी केली साने गुरुजी जयंती…

रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली. साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साने गुरुजी कथामाला सांगोला चे अध्यक्ष श्री भीमाशंकर पैलवान हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवराच्या हस्ते साने गुरुजी यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
त्यानंतर खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हणण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.चौरे सावंत मॅडम व सौ.बनकर मॅडम यांनी उपस्थिताचे स्वागत केले.रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे स्वरूप सांगितले. प्रमुख पाहुणे श्री भीमाशंकर पैलवान यांनी साने गुरुजींच्या जीवनातील महत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले. तसेच गुरुजींच्या आयुष्यातील दोन प्रसंग सांगितले. याप्रसंगी रो.अरविंद डोंबे गुरुजी व रो. हळळीसागर यांनी आपली विचार व्यक्त केले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक देण्यात आले.रोटरी क्लबचे सचिव रो.इंजि.विलास विले यांनी शाळेचे आभार मानले.या कार्यक्रमास साने गुरुजी कथामाला चे श्री विसापुरे सर व श्री वाघमारे सर उपस्थित होते.