जवळे (वार्ताहर) जि.प. प्राथमिक मुलींची शाळा जवळे यांची शैक्षणिक सहल सज्जनगड, ठोसेघर धबधबा व अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणी गेली होती.सहलीची सूचना मिळाल्या पासूनच सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंदात व उत्साही दिसून येत होत्या. सहलीला निघताना बरोबर सहा वाजता अगदी वेळेवर सर्व चिमुकल्या गोळा झाल्या होत्या सर्वप्रथम सज्जनगडला पोहोचलो त्यानंतर सज्जनगडावरील सर्व पॉईंट्स पाहिले मुलींना माहिती सांगितली सर्वांनी तेथील प्रसादाचा आस्वाद घेतला नंतर ठोसेघर धबधब्याला पोहोचलो तेथील निसर्गाची किमया डोंगर दरी, झाडे, पक्षी, प्राणी याबाबत अनेक प्रश्न मुलींनी विचारून त्यांचे निरसन करून घेतले.
शेवटी सर्वजण अजिंक्यतारा किल्ला पाहण्यासाठी गडावर चढले किल्ला सगळीकडे फिरून पाहिला त्याबद्दल तेथे माहिती सांगण्यात आले रात्री गाडीमध्ये गाणी म्हणत नृत्य करत मुलींनी धमाल केली व एका वेगळ्याच आनंदात सर्व मुली घरी परतल्या सदरची सहल यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख श्री.तानाजी साळे शाळेतील शिक्षक श्री.विकास साळुंखे,श्रीमती रतन कोळेकर श्रीमती सुवर्णा शेडसाळे मॅडम शा.व्य स.अध्यक्ष सौ.छाया वांडरे सर्व सदस्य पालक व गाडी मालक व चालक माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.