महाराष्ट्र

नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल  मध्ये पालक कार्यशाळा

नाझरा (वार्ताहर):- पालकांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आतापासूनच आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच मुलांचे ध्येय ओळखूनआर्थिक नियोजन करा. असा संदेश धनवर्धन प्रायव्हेट लिमिटेड च्या डायरेक्टर शीतल लवटे  यांनी पारितोषिक वितरण व पालक कार्यशाळा मध्ये दिला. या कार्यक्रमाची सुरुवात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आली.नाझरा गावचे सरपंच संजय सरगर व  उपसरपंच सुवर्णा पाटील तसेच धनवर्धन प्रायव्हेट लिमिटेड च्या शितल लवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .तसेच नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण  घेण्यात आला.
तसेच नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. मंगल पाटील तसेच नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक बिभीषण माने यांच्या हस्ते मा., शितल लवटे, निवेदिता सामंत , पूजा सावळे  सत्कार करण्यात आले. तसेच शितल लवटे यांनी पालकांसाठी आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले व त्यांचे महत्व आपल्या संवादातून पटवून दिले.तसेच महिला पालक कार्यक्रमासाठी जास्त संख्येने उपस्थित होते.यावेळी पालक सागर आदाटे व लांडगे या पालकांनी  मुलांच्या भविष्याच्या गुंतूवणूक करा असा संदेश दिले. 85 पालक हजर होते.पालकांशी संवाद सादत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शामल लोखंडे यांनी केले आणि आभार सुदर्शन माने  यांनी केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button